कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका - Don’t ignore ear pain



कमी ऐकू येणे, कान ठणकणे आदी दुखण्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र, कानातून पाणी, रक्त किंवा रक्तमिश्रीत पू येणे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भविष्यात त्यातून मोठे रोग होऊ शकतात.

कान फुटणे हा आजार नेहमी दिसून येतो. मात्र, लहान मुले, कुपोषित, जुन्या आजाराने त्रस्त झालेल्या रूग्ण किंवा त्यांच्या आसपास वावरणार्‍या व्यक्तींच्याही कानातून रक्तमिश्रित चिकट द्रव नेहमी बाहेर पडत असेल तर त्यावर लागलीच उपचार करणेच योग्य ठरते. वायू प्रदूषण, एलर्जी, कुपोषण आदी समस्या कान वाहण्यास कारणीभूत ठरतात. काही वेळा दातांचे इंफेक्शनही कान वाहण्याचे कारण होऊ शकते.

कानाचा पडदा फाटल्यानंतर दोन प्रकारच्या समस्या उद्भवतात. त्यातील पहिली म्हणजे कानाच्या पडद्याला छिद्र पडणे व दुसरे म्हणजे कानातील हाड वाढणे. जेव्हा कानाच्या पडद्याला इजा पोहचते तेव्हा कानात इंफेक्शन होते व ते रक्त वाहिन्या तसेच मेंदूपर्यंत पोहचते. त्यामुळे मेंदूला सूज येणे, चक्कर येणे, लकवा होणे, अशा समस्या उद्भवतात. ऐडीनायडस अथवा टॉन्सिल्समुळे कानात इंफेक्शन झाले असेल तर औषधोपचार करून ते ठीक करता येऊ शकते. कानाच्या बाह्य भागात जखम झाली असेल तरीही कानातून रक्तमिश्रित पू वाहतो. एका नलिकेद्वारे नाकच्या मागची बाजू व गळ्याचा वरचा हिस्सा कानाशी जोडलेला असतो.
इंफेक्टेड एडिनायड अथवा टॉन्सिल्स ऑपरेशनद्वारा काढले जातात. त्याचप्रमाणे ऑपरेशनद्वारेच कानाच्या पडद्यावरील छिद्र बंद केले जाते. या ऑपरेशनला 'टिंपेनो प्लास्टी' म्हटले जाते. या ऑपरेशनमध्ये कानामध्ये त्वचेचा कृत्रिम पडदा तयार करून बसविला जातो.



कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया, फंगल इंफेक्शन आदी कारणाने कानातून पू येत असतो. कान फुटण्याचा आजार जन्मजात नसतो. कानाच्या बाह्य भागात जखम होणे तर कानाच्या आतल्या भागात फोड झाल्याने कानातून रक्तमिश्रित द्रव बाहेर येतो. तसेच नाक व गळ्यामध्ये झालेल्या काही व्याधीमुळेही कान दुखण्यास सुरवात होते. अशा परिस्थितीत कानावर सूज येते. कानात एक प्रकारचा चिकट द्रव मोठ्या प्रमाणात तयार होतो व तो कानातच साचतो. त्यामुळे कानाच्या पडद्याला इजा पोहचते. कान दुखायला सुरवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता. लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.