श्रवणदोष

Emi on hearing aid ahmednagar Beed



 एक छुपा त्रास!😌😌आपल्या देशात असंख्य लोकांना श्रवणदोष अर्थात बहिरेपणा आढळतो, पण त्यावर काही इलाज करून घ्यावा, असे वाटणारे कमी असतात. किंबहुना त्यावर अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत, हेही बऱ्याच जणांना माहीत नसते.➡️➡️➡️➡️ ऐकू येणे ही एक महत्त्वाची संवेदना. त्याबाबत हे दहा प्रश्न स्वतःला विचारा.

कुणी बोलताना वारंवार ‘काय’ असे विचारावे लागते का?
फोनवरचा संवाद तुम्हाला नीट ऐकू येतो?
दाराची बेल वाजलेली सहजासहजी समजते?
बोलणाऱ्या व्यक्तीच्या चेहेऱ्याकडे लक्षपूर्वक पहावे लागते?
समुदाय चर्चेत नेमके कोण बोलले ते सहजी उमगते?
टीव्हीचा आवाज इतरांपेक्षा तुम्हाला मोठा करावा लागतो?
स्त्री वा मुलांच्या तुलनेत पुरुषांचा आवाज जास्त समजतो?
कुठल्या दिशेने कोण बोलले ते समजते?
कोलाहल असलेल्या जागी २४ तासांपैकी किती वेळ तुम्ही असतात?
शांत जागी कानात गुणगुण जाणवते?

Newest